Location.png

नवी मुंबई, महाराष्ट्र 

55500571b8176366dd4298b925235cb2-3d-cont

+91-8080 955 955

  • Facebook
  • Twitter
  • YouTube
  • Pinterest
  • Tumblr Social Icon
  • Instagram
logonew-100.png

आमची यशोगाथा

 

आम्ही काय करतो 

 

नेतृत्व जन्माला येत नसतात तर त्यांची घडणावळ मोलाची ठरते.  हीच मेख ओळखून ‘चाणक्य’ च्या माध्यमातून श्री. राम भोजने यांनी देश विदेशातील विविध क्षेत्रातील आपला अनुभव पणाला लावून अविरत ध्यास घेतला,  तो असे लोकप्रतिनिधी घडविण्याचा असे परिपूर्ण लोकनेते जे अगदी ग्रामपंचायत ते थेट केंद्रापर्यंतचा कारभार आपल्या गुण कौशल्याच्या जोरावर यशस्वी करून देशाला परिणामकारक समाजकार्य देऊ शकतील आणि असे व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी अतिमह्त्वाचा दुवा असतात आपल्या निवडणुका. अतिशय सुनियोजित अशा निवडपूर्व आधुनिक कार्यप्रणालीव्दारे आणि आर्थिक दबावाचे नुकसान न सोसता लढविल्या गेलेल्या निवडणुकांतून जनतेला असे कर्तव्यदक्ष सन्माननीय नेतृत्व लाभावे, हे ‘चाणक्य’ चे मुळ उद्धिष्ट. जिंकण कुणाला नाही आवडत….. पण ज्याला पदावर चिकटून राहायचे आहे. त्या प्रत्येकास तिथवर पोहोचण्यासाठी पूर्व तयारीची आवश्यकता असतेच. ह्यासाठी पंधरा वर्षापासून सातत्यपूर्वक अभिनव  उपक्रम राबवत श्री. राम भोजने यांनी राजकीय कारभारातील सर्वोत्तम गतिशील यशासाठी एकहाती सत्तेचा पुरस्कार करत ठिकठिकाणी ते सिद्ध करून  दाखविले आहे.  सुसंवादाचा मार्ग तुम्हाला थेट लोकांच्या  हृदयापर्यंत घेऊन जातो आणि कार्यकर्ता – जनता यांमधील हे भावनिक ऋणानुबंध यशाच्या प्रगतीसाठी पूरक ठरतात. तुमची व तुमच्या कार्याची ओळख जनसामान्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी चाणक्य चा तुमच्यासाठी हा सदिच्छापूर्वक प्रयास.

​आमच्या सेवा

 
survey-500x402.png

हितगुज मतदार राजाशी

सर्वेक्षण मतदार संघाचे

मतदार संघाचे तपशीलवार सर्वेक्षण करण्यासाठी

चाणक्य एका विशाल प्रमाणात घरोघरी जाऊन

माहिती जमा करते. सर्वेच्या माध्यमातून

जनतेमध्ये दारोदार जाऊन उमेदवाराची ओळख

व कार्य लोकांपर्यंत पोहोचवते. सर्वेतून

जमा केलेल्या माहितीच्या आधारे कॅाल सेंटर

द्वारे नियमितपणे मतदारांशी संपर्क साधला जातो.

तसेच या माहितीच्या आधारे नवीन मतदार नोंदणीही

केली जाते.

Booth-committee-new-1-500x455.png

BOOTH COMMITTEE

निवडणूक रणनीतीचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा सर्वात आधी विचारात घेतली जाणारी महत्वाची पायरी म्हणजे बुथ कमिटी. बुथ कमिटीचे निवडणूक नियोजनामधले स्थान अनन्यसाधारण आहे. बुथ कमिटी म्हणजे काय व यात कोणाचा समावेश असावा याविषयीचे मार्गदर्शन चाणक्य करते. बुथ कमिटीची जबाबदारी काय असावी तसेच निवडणुकीच्या दिवशीचे व त्या दिवसापर्यंतचे आजपासूनचे नियोजन कसे असावे याचा सुनियोजित आराखडा चाणक्य ने तयार केला आहे.

शोध लोकनायकाचा
कानोसा जनमानसाचा– सर्वे
जनमत चाचणी द्वारे जनसंखेच्या मुलभूत समस्यांची माहिती जमा करण्याचे कार्य चाणक्य करते. जनतेचा अनेक विषयांवरचा कल लक्षात घेऊन, त्यांचे वर्गीकरण केले जाते. प्रत्येक विभागातील जनतेकडून पक्षाविषयी व लोक प्रतीनिधीविषयी मत जाणून घेऊन चाणक्य द्वारे प्रचाराची रणनीती ठरवली जाते.

निवडणुकीची नवीन युद्धभूमी
सोशल मिडिया
बदलत्या जगाच्या वेगासोबत चालायचे असेल तर सोशल मिडिया आजच्या समाज मनाचा आरसा आहे. सोशल मिडियाचा प्रभावी वापर करुण आपले विचार आणि धोरण जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यास चाणक्य मदत करते.

आधार घटक
राजकीय संतुलन आणि समतोल साधण्यासाठी सामाजिक आधार स्तंभ हा एक महत्वाचा दुवा आहे. सामाजिक आधार स्तंभांचा संपर्क एका रात्रीत निर्माण होऊ शकत नाही. सामाजिक आधार स्तंभांचे वर्गीकरण सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, शैक्षणिक, क्रीडा  उद्योजक अशा प्रकारे करण्यात येते म्हणूनच चाणकयच्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत उमेदवाराची ओळख आणि कार्य पोहोचवण्यासाठी अत्यंत प्रभावी यंत्रणा राबवली जाते.

हितचिंतक
उमेदवार आणि राजकीय व्यक्ती सातत्याने कार्यकर्त्यांच्या संपर्कात असते.त्यामुळे जनसंपर्क टिकून राहतो. प्रत्येक कार्यकर्त्याचे स्वतःचे असे एक हक्काचे वलय असते. याच वलायातील लोकांशी संपर्क साधून त्यांना कार्यासाठी सक्रीय करण्याचा उपक्रम हितचिंतक यादीद्वारे केला जातो.

WAR ROOM
Man To Man Marking
कार्यकर्त्यांना सक्रीय करून त्यांना आवश्यक असलेली सर्व यंत्रणा पुरवणे आणि Man To Man Marking च्या सहाय्याने अधिकाधिक मतदारापर्यंत पोहोचवणे हे War Room Planning चे प्रमुख उद्धिष्ट आहे. कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवून त्यांच्या संपर्कात रहावे यासाठी चाणक्याने खास Mobile App आणि Computer Software ची निर्मिती केली आहे.

IMAGE BUILDING
एका उमघ्या व्यक्तिमत्वाची निर्मिती
जनतेला आपला नेता आपलासा वाटावा पण तो आदर्श हि वाटावा यासाठी चाणक्य विविध उपक्रमाचे प्रयोजन करून उमेदवाराची ओळख आणि व्यक्तिमत्व जनसामान्यापर्यंत घेऊन जाण्यास मदत करते. अगदी देहबोली कशी, पेहराव कसा करावा, भाषण कसे करावे, इथपासून मोबाईल ची रिंग टोन कशी असावी. यासाठी चाणक्य संशोधन करून लोकांशी सुसंवाद साधताना कोणते मुद्दे घेऊन जावेत याची सखोल माहिती पुरविते.

​संचालक 

 

जिंकलेलं व्यक्तिमत्व. अजिंक्य राहण्यासाठी !
सोपं असणं फार कठीण असतं. आपल्याला ते इतकं कठीण यासाठी वाटतं कारण त्या विषयाचा व्याकरण आपल्याला अवगत नसतं. पण दशकाहून अधिक काळ राजकारण हा विषय केवळ छंद म्हणून नव्हे तर पॅशन म्हणून जोपासताना माझ्या कडून जाणीवपूर्वक त्याचा अतिशय बारकाईने अभ्यास केला गेला. उच्चशिक्षणाच्या योगे देशात व परदेशात अनेक कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम केल्यामुळे मॅनेजमेंटचा तर अनुभव दांडगा होता. पण तरीही माझ्या बुद्धी व कार्यक्षमतेच्या तीव्रतेचा उच्चांक अजूनही शोषला जात नव्हता. आपल्या क्षमतांच्या पार जाऊन केलेलं कार्य आपल्यास एक वेगळीच आत्मिक अनुभूती देऊन जातं. तेव्हा आपल्या आवडत्या क्षेत्रात म्हणजेच राजकारणात आपल्याकडून काही अनोखं नाविन्यपूर्ण तसेच लोकापयोगी कार्य घडावं, अशी प्रबळ इच्छा होती. त्यातच मी केलेल्या अभ्यासपूर्ण अवलोकनातून भारतीय राजकारण हे लोकसेवेचं अतिशय प्रभावी माध्यम ठरू शकतं, ह्याची जाणीव मला झाली. तरीही नुसतच राजकारणात पडून एखाद्या पक्ष्याद्वारे लोकसेवेत सक्रीय होण म्हणजे पुन्हा माझ्या सर्व क्षमतांना मर्यादा घालण्यासारखंच ठरलं असतं. मी तर असं काहीतरी देऊ इच्छित होतो ज्याचा फायदा संपूर्ण राजकारणालाच होईल आणि ओघाने समाजकार्यही घडेल. शिवाय जे काही करायचं ते फार तंत्रशुद्ध पद्धतीने आणि मॅनेजमेंटच्या स्वानुभवाचा संपूर्ण उपयोग करून हे मात्र निश्चित होतं. कारण त्यातून होणारे फायदे हे जनतेसाठी दिर्घकाळ लाभदायक ठरणारे होते. मग निश्चय केला कि आपल्या राजकारणातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच सुसूत्रपणे एका योजनाबद्ध कार्यप्रणालीत आणायची आणि जनता व नेता यांमध्ये निर्माण झालेली दरी त्यांच्याच सुसंवादाने मिटवायची. त्यायोगे जनतेला त्यांचा लोकनेता मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा. हे सारं घडून आणण्यासाठी सातत्याने परिश्रमपूर्वक प्रयत्न केले आणि वेळोवेळी पाहिलेली स्वप्न आकारात आणली. राजकारण सुनियोजित व विश्वासार्ह वाटावं इतकं सोपं व दर्जदार व्हावं, जनतेला आदर्श लोकनेते लाभावेत आणि देशाच्या राजकारणाला एक आगळी झळाळी प्राप्त व्हावी, ह्या दिशेने मी आरंभलेले प्रयत्न सदैव कार्यरत असतील. माझं कार्य हेच माझं श्रद्धास्थान असल्यामुळे असा पडद्यामागचा कलाकार होण्यातही एक वेगळाच आनंद मिळतो. देवालयातील पुजारी जेव्हा मुख्य देवताला स्ननादी अभिशेक व सर्व विधी पद्धतशीर पार पाडून, यथायोग्य साजशृंगार करून लोकांना आशीर्वाद देण्यासाठी व त्यांच्या मनातील गाऱ्हाणी ऐकण्यासाठी सज्ज करतो, तेव्हा त्यास जेवढा आनंद होत असेल.किंबहुना त्याहूनही अधिक समाधान मला माझ्या ह्या कार्यातून मिळत आले आहे.

ram-sir-768x432.png

संस्कृती

20180526_160111
20180526_171151
20180526_160729
20180526_172853
20180526_171157
20180526_160551
20180526_171153
20180526_182240
20180526_172736
20180526_182248
20180526_182343
20180526_182417
20180526_182251
20180526_182333
20180526_182301
20180526_182353
20180526_182333(0)
20180526_182407
20180526_182325
20180526_182311
1/5
 

संपर्क

 

मुख्यालयाचा पत्ता 
 

९०२, सतरा प्लाझा, ९ मजला , प्लॉट क्र. १९/२०, पाम बीच मार्ग, फेज २, सेक्टर १९-ड, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र ४०० ७०६.

डाटा सेंटर पत्ता 
 

५२४/५२५, ६ वा मजला, सेन्ट्रल फ्यासीलीटी बिल्डींग, एपीएमसी फळ बाजार, सेक्टर १९, तुर्भे, नवी मुंबई, महाराष्ट्र ४०० ७०५.           

   अधिक माहिती  संकेतस्थळ

+91-8080 955 955

आमचे प्रतिनिधी 

+91-7045991170 / 9223575189 /90/91 /92/93

Developed By ORNET Technologies Pvt. Ltd.