जिंकलेलं व्यक्तिमत्व. अजिंक्य राहण्यासाठी !

सोपं असणं फार कठीण असतं. आपल्याला ते इतकं कठीण यासाठी वाटतं कारण त्या विषयाचा व्याकरण आपल्याला अवगत नसतं. पण दशकाहून अधिक काळ राजकारण हा विषय केवळ छंद म्हणून नव्हे तर पॅशन म्हणून जोपासताना माझ्या कडून जाणीवपूर्वक त्याचा अतिशय बारकाईने अभ्यास केला गेला. उच्चशिक्षणाच्या योगे देशात व परदेशात अनेक कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम केल्यामुळे मॅनेजमेंटचा तर अनुभव दांडगा होता. पण तरीही माझ्या बुद्धी व कार्यक्षमतेच्या तीव्रतेचा उच्चांक अजूनही शोषला जात नव्हता. आपल्या क्षमतांच्या पार जाऊन केलेलं कार्य आपल्यास एक वेगळीच आत्मिक अनुभूती देऊन जातं. तेव्हा आपल्या आवडत्या क्षेत्रात म्हणजेच राजकारणात आपल्याकडून काही अनोखं नाविन्यपूर्ण तसेच लोकापयोगी कार्य घडावं, अशी प्रबळ इच्छा होती. त्यातच मी केलेल्या अभ्यासपूर्ण अवलोकनातून भारतीय राजकारण हे लोकसेवेचं अतिशय प्रभावी माध्यम ठरू शकतं, ह्याची जाणीव मला झाली. तरीही नुसतच राजकारणात पडून एखाद्या पक्ष्याद्वारे लोकसेवेत सक्रीय होण म्हणजे पुन्हा माझ्या सर्व क्षमतांना मर्यादा घालण्यासारखंच ठरलं असतं. मी तर असं काहीतरी देऊ इच्छित होतो ज्याचा फायदा संपूर्ण राजकारणालाच होईल आणि ओघाने समाजकार्यही घडेल. शिवाय जे काही करायचं ते फार तंत्रशुद्ध पद्धतीने आणि मॅनेजमेंटच्या स्वानुभवाचा संपूर्ण उपयोग करून हे मात्र निश्चित होतं. कारण त्यातून होणारे फायदे हे जनतेसाठी दिर्घकाळ लाभदायक ठरणारे होते. मग निश्चय केला कि आपल्या राजकारणातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच सुसूत्रपणे एका योजनाबद्ध कार्यप्रणालीत आणायची आणि जनता व नेता यांमध्ये निर्माण झालेली दरी त्यांच्याच सुसंवादाने मिटवायची. त्यायोगे जनतेला त्यांचा लोकनेता मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा. हे सारं घडून आणण्यासाठी सातत्याने परिश्रमपूर्वक प्रयत्न केले आणि वेळोवेळी पाहिलेली स्वप्न आकारात आणली. राजकारण सुनियोजित व विश्वासार्ह वाटावं इतकं सोपं व दर्जदार व्हावं, जनतेला आदर्श लोकनेते लाभावेत आणि देशाच्या राजकारणाला एक आगळी झळाळी प्राप्त व्हावी, ह्या दिशेने मी आरंभलेले प्रयत्न सदैव कार्यरत असतील. माझं कार्य हेच माझं श्रद्धास्थान असल्यामुळे असा पडद्यामागचा कलाकार होण्यातही एक वेगळाच आनंद मिळतो. देवालयातील पुजारी जेव्हा मुख्य देवताला स्ननादी अभिशेक व सर्व विधी पद्धतशीर पार पाडून, यथायोग्य साजशृंगार करून लोकांना आशीर्वाद देण्यासाठी व त्यांच्या मनातील गाऱ्हाणी ऐकण्यासाठी सज्ज करतो, तेव्हा त्यास जेवढा आनंद होत असेल …किंबहुना त्याहूनही अधिक समाधान मला माझ्या ह्या कार्यातून मिळत आले आहे…

 

©Chanakya Election Management